माझी आजी निबंध मराठी Essay on My Grandmother in Marathi

माझी आजी निबंध मराठी Essay on My Grandmother in Marathi: माझी आजी मला खूप प्रिय आहे. माझ्या आजीचे आत्ता वय झाले आहे. माझ्या आजीचे नाव श्रीमती संतोशी गुप्ता आहे.

माझी आजी निबंध मराठी Essay on My Grandmother in Marathi

माझी आजी निबंध मराठी Essay on My Grandmother in Marathi

ती पासष्ट वर्षांची आहे. या वयातही ती खूप सक्रियतेने काम करते. ती माझी प्रत्येक गरज पूर्ण करते.

माझी आजी सकाळी लवकर उठते. ती खूप धार्मिक स्त्री आहे. तिचे केस बर्फासारखे पांढरे आहेत व कोमल आहेत. ती उंच आणि सडपातळ आहे. ती स्वच्छ आणि सैल साडी नेसते.

ती खूप छान दिसते. ती वयाने वृध्द असली तरी ती सर्वांची  लाडकी आहे. कुटुंबातील सर्व महत्त्वाच्या कामांवर ती देखरेख ठेवत असते. ती प्रत्येक बाबतीत साधेपणाने सल्ला देते. तिच्या वयामानाने ती खूप कमी अन्न खाते.

माझे आई वडील सर्व बाबतीत तिचा सल्ला घेतात. तिला धार्मिक चित्रपट पाहायला खूप आवडतात. ती नेहमी देवाची प्रार्थना करताना दिसते.

रात्री ती मला गोष्टी सांगते. ती मला माझ्या अभ्यासात लक्ष देण्यास सांगते. ती माझ्यावर खूप प्रेम करते. माझे तिच्यावर खूप प्रेम आहे. तिला दीर्घायुष्य लाभो व तिचे आयुष्य सुखकर होवो हीच देवा चरणी प्रार्थना आहे.
About Author: